गिम्हवणेत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचें आयोजन..!

Spread the love

दापोली – गिम्हवणे दापोली येथील श्री गजानन महाराज भक्तमंडळातर्फे प्रकटदिन उत्सव सोहळा सुरु असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमांना भक्तमंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन गजानन महाराज भक्त मंडळ गिम्हवणे यांनी केले आहे.

रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ ते ७ काकड आरती, पंचामृती पूजा, अभिषेक, सकाळी ७ ते ८ नामजप, सकाळी ८ ते ९ अक्षत अभिषेक, सकाळी ९ ते ४ श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायं. ४ ते ६ विद्याधरशास्त्री करंदीकर, आंजर्ले यांचे प्रवचन , सायं ६ नंतर आरती, ७ ते ८ सुशांत देवघरकर आणि सहकारी यांचे श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ गिम्हवणे सुतारवाडी यांचे भजन.

सोमवार १३ फेब्रुवारी प्रकटदिन सोहळा सकाळी ५ ते १० काकड आरती, अभिषेक व लघुरुद्र, पालखी पादुका प्राणप्रतिष्ठापना, सकाळी १० ते १२:३० प्रख्यात कीर्तनकार आणि प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे धामणी संगमेश्वर यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी १२:३० पासून झुणकाभाकर महाप्रसाद, २ ते ४ संगीत सेवा, ४ ते ५ वारकरी संगीत सेवा, सायं ५ ते ६:३० श्रींची पालखी मिरवणूक, ५ ते ५:४५ मंत्रजागर, ६ ते ७ रमेश कडू ब्राम्हणवाडी आणि सहकारी यांचे श्री माऊली भजनी मंडळाचे भजन, ७ ते ८ मंदार जाधव आणि सहकारी जालगाव यांचे दत्त प्रासादिक भजनी मंडळाचे भजन, रात्रौ ९ ते १० हरिपाठ, १० वा. प्रकटदिन समारोप आरती या सर्व कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page