▪️ केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या भारत पर्यटन कार्यालयाकडून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. डॉन बॉस्को विद्यालय, पणजी आणि ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा या दोन शाळांमधील ५५ विद्यार्थ्यांनी हेरिटेज वॉकमध्ये सहभागी घेतला. डॉन बॉस्को शाळा ते आझाद मैदान अशी फेरी काढून विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर देशाचा स्वातंत्र्यलढा आणि गोव्याचा इतिहास याविषयी मान्यताप्राप्त गाईडकडून मार्गदर्शन करण्यात आले.
▪️ भारताला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वारसा लाभला आहे, जो मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. आपल्या देशात पर्यटनाला चालना देणे आणि जागरुकता वाढवण्यासाठी सरकारकडून २५ जानेवारी रोजी भारत राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.