जनशक्तीचा दबाव न्यूज | दापोली | जानेवारी ३१, २०२३.
दापोली तालुक्यातील जालगाव येथील श्री शैल सभागृह, दाभोळ रोड येथे दि. २९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तिसऱ्या राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन लाठी असोसिएशन महाराष्ट्र व लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेस देशातील १७ राज्यातून सुमारे सव्वादोनशे स्पर्धक उपस्थित रहाणार आहेत. लाठी इंडिया ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, टेक्निकल डायरेक्टर व महागुरू हे उपस्थित राहणार आहेत. तमाम नागरिकांना कोकण विभागात प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेस २९ जानेवारी रोजी आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
विशेष या राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकही रूपयाचे प्रायोजकत्व न घेता संघटनेने स्वबळावर या स्पर्धेचे आयोजन केल्याचे संयोजकांनी नमूद केले आहे.