बेकायदा राजकीय कंटेनर शाखेला विरोध; अन्य पक्ष मनपा आयुक्तांच्या भेटीला,

Spread the love

मिरा रोड: मिरा-भाईंदर शहराच्या विविध भागांत रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत शिवसेनेच्या शिंदे गटाने कंटेनरमध्ये शाखा उभारल्या आहेत. या कंटेनर शाखा बेकायदा असल्याचे सांगत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे इत्यादी राजकीय पक्षांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावर आंदोलनेही झाली. सोमवारी सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेतली. शिंदे गटाच्या बेकायदा शाखांवर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर, राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांवरील कारवाई संदर्भात याआधी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्त काटकर यांनी त्यांना दिले.

मात्र महापालिकेने यानुसार कारवाई केल्यास, शिंदे गटासह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ५५ कार्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अन्य राजकीय पक्षांपुढेच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका मवाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page