मुंबई- अजित पवार यांनी भाजपच्या दबावाला न जुमानता नवाब मलिक यांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अजित पवार आज शिवाजीनगर माणखुर्द येथे नवाब मलिकांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. ते नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत.
अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी रोड शो चे आयोजन करण्यात आले. या रोड शो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सहभागी झाले होते. यावेळी अजित पवार हे नवाब मलिक यांच्या शेजारी उभे राहून लोकांना अभिवादन करत होते.
..तरी आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत…
अजित पवार म्हणाले, मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. भाजप नवाब मलिकांचा प्रचार करत नसले तरी आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत. अबू आझमी जरी इथले आमदार असले, तरी त्याबाबत मतदार निर्णय घेतील. मागील तीन टर्म आमदार असताना अबू आझमी यांनी विकास केला नाही. शिवाजीनगर माणखुर्द येथे कचरा, लोकांचे आरोग्य यांसह अनेक अडचणी आहेत. नवाब मलिक यांनी प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर आम्ही येथील सर्व अडचणी दूर करू, असे अजित पवार म्हणाले.
नवाब मलिक काय म्हणाले?..
नवाब मलिक म्हणाले, अजित पवार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी मला उमेदवारी दिली. आता ते माझ्या प्रचारासाठी आले आहे. अजित पवारांनी मला ज्या हिमतीने मला उमेदवारी देण्यात आली, त्या हिमतीला दाद देण्यासाठी लोक अजित पवारांच्या स्वागतासाठी येथे आले आहेत.
नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध…
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आले, तेव्हापासून महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपचा त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या म्हणाले की, पक्ष नवाब मलिक यांच्या बाजूने प्रचार करणार नाही, त्यांना पराभूत करण्यासाठी लढेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आला आहे.