ठाणे : निलेश घाग निकाल हास्यास्पद असाच आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आज ढसाढसा रडले आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल येणार हे आधीच माहीत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना नक्कीच पुन्हा न्यायालयात धाव घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षांतर बंदीच्या कायद्याला हरताळ फसण्यात आला आहे. मात्र आता महाराष्ट्रातील जनतेचा निकाल घेतला जाणार आहे. पक्ष कोणी फोडला हे जनतेला नक्कीच माहित आहे, बाळासाहेबांचे उत्तरधिकारी कोण आहे, हे देखील जनतेला माहित आहे. त्यामुळे आता जनताच योग्य निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जाहिरात