टॅंकरची दुचाकीला धडक,अपघातात एक जागीच ठार

Spread the love

रत्नागिरी :- मुंबई – गोवा महामार्गावरील पाली येथील उभी धोंड येथे वळणावर दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार , तर दुसरा जखमी झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी रात्री ८:३० वाजता झाला . अमोल अशोक पवार ( ३५ ,रा . साळवी स्टॉप , रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे . तर प्रेम संजय पवार ( १९ , रा . साळवी स्टॉप , रत्नागिरी ) हा जखमी झाला . अमोल पवार व प्रेम पवार दुचाकी ( एमएच ०८ , वाय ४९१२ ) घेऊन सांगलीहून रत्नागिरीला येत होते . दुचाकी महामार्गावरील पाली येथील उभी धोंड येथे आली असता मागून येणाऱ्या टँकर ( एमएच ४३ , सीइ ०५०५ ) ने मागून ठोकर दिली . ही धडक इतकी जोरदार होती की , दुचाकीस्वार टँकरच्या चाकाखाली आला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला . दुचाकीवरील जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र , उपचारापूर्वीच चालकाचा मृत्यू झाला होता . रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षक महामुने यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट दिली . अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page