
रत्नागिरी, दि. 8 (जिमाका) : – ग्रामसेवकांनी जन्म-मृत्यूची 100 टक्के नोंदणी crsorgi.gov.in या पोर्टलवर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जन्म-मृत्यू नोंदणीविषयक जिल्हास्तर समन्वय समितीची सभा आज झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत खवळे आददी उपस्थित होते.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जन्ममृत्यू नोंदणीकरिता मॅन्यूअल पध्दतीचा अवलंब न करता केंद्र शासनाच्या सीआरएस ऑनलाईन पोर्टलचा वापर करावा. याबाबत गटविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घ्यावी.