रत्नागिरी- कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे भूतपूर्व सैनिकांचा सन्मान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. स्वयंवर मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
२६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिल युद्धात ऐतिहासिक विजय संपादन केला आणि आपल्या ताकतीची प्रचिती जगाला दिली. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या ऐतिहासिक विजयाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने रत्नागिरी आणि परिसरातील भूतपूर्व सैनिकांचा सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मोहन सातव, महेंद्र सुर्वे, शंकर मिलके, विजय आंबेरकर, शिवाजी पाटील, प्रसाद कुलकर्णी, विष्णू जाधव, अप्पा सावंत, हेमंत देसाई, निलेश सिरसट, नंदकुमार पाटील, लक्ष्मण गवळी, अमृत पाटील, महादेव पाटील, साहेबराव बोरगे, उत्तम वेताळ, सुनील कदम आणि महेश सुवरे या माजी सैनिकांचा शाल, गुलाबपुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रदेश सदस्य सचिन वहाळकर यांनी कारगिल जय दिवसाचे महत्व विशद केले आणि सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, मंदार खंडकर, प्रदेश सचिव विक्रम जैन, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, स्वप्नील गोठणकर, तालुकाध्यक्ष संकेत कदम, प्रतीक देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.