लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मोठा झटका, महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश .…

Spread the love

लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मोठा झटका बसला आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मोठा झटका बसला आहे. येथील बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी तसेच अन्य नेत्यांनी ९ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल यांचा भाजपात प्रवेश…


काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल या नेत्यांचाही समावेश आहे. पचौरी हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जायचे. ते केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते. ते चार वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे मोठे आणि महत्त्वाचे नेते होते. मात्र लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन थेट भाजपात प्रवेश केला आहे.

काँग्रेसमध्ये असताना भूषवली महत्त्वाची पदे…

काँग्रेसमध्ये असताना पचौरी यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते युवक काँग्रेसचेही राज्य अध्यक्ष राहिलेले आहेत. तर राजुखेडी हे आदिवासी समाजातील मोठे नेते मानले जातात. ते १९९८, १९९९ आणि २००९ अशा एकूण तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर धार या जागेवरून खासदार झालेले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी ते भाजपात होते. १९९० साली ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केलाय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page