चिपळूण – चिपळूण तालुक्यातील सावर्डे आणि खोतवाडी लघु पाटबंधारे योजनांचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला असंख्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सावर्डे गाव परिसरातील ४० गावांसाठी केंद्रबिंदू आहे, जिथे मोठी बाजारपेठ, शैक्षणिक संकुल, हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजेस आहेत. येथील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि दरवर्षी उन्हाळ्यात भासणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे लघु पाटबंधारे योजना अत्यंत गरजेची होती. या प्रकल्पाची दीर्घकाळापासून मागणी होत होती आणि या धरणामुळे ४० गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
आमदार शेखर निकम यांनी शासन स्तरावर सातत्याने या योजनेचा पाठपुरावा केला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी करून ८४ कोटी ७७ लाख ९५ हजार ६०५ रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या धरणाची लांबी ५४० मीटर, उंची ३२ मीटर आणि सिंचन क्षेत्र २१३ हेक्टर असेल.
आमदार शेखर निकम यांचे स्वप्न होते की ग्रामस्थांना पाण्याच्या प्रश्नातून मुक्त करणे, आणि ते आमदार झाल्यानंतर त्यांनी २२ कोटींची जनजीवन मिशन योजना मंजूर करुन आणली आहे, जी लवकरच पूर्ण होईल. सावर्डे लघु पाटबंधारे योजना त्याच दूरदृष्टीचा एक भाग आहे. पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी कोकणात लघु पाटबंधारे योजना आवश्यक आहे, आणि याचाच एक भाग असलेली लघु पाटबंधारे योजना सावर्डे, खोतवाडी यासाठी ८५ कोटींचा निधी मिळवण्यात यशस्वी झाले.
या मोठ्या निधीच्या मंजुरीमुळे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. योजनेच्या भूमिपूजनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, या योजनेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी माजी सभापती पूजाताई निकम, सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमिर मुल्लाजी, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूशेठ चव्हाण, माजी सरपंच बाळूशेठ मोहिरे, उद्योजक पिंट्याशेठ पाकळे, केतनशेठ पवार, बंधूशेठ पाकळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शौकतभाई माखजनकर, माजी सरपंच शांतारामशेठ बागवे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष समीर काझी, नूतन सेवा संघ सावर्डे खोतवाडी अध्यक्ष निलेश चव्हाण, मुंबई अध्यक्ष रघुनाथराव चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, शरद चव्हाण, संजय मारुती चव्हाण, संजय शिवाजी चव्हाण, यशवंतराव चव्हाण, दिपक रघुनाथ चव्हाण, गजानन चव्हाण, रमेश चव्हाण, नितीन चव्हाण, प्रदिप चव्हाण, माऊली चव्हाण, संतोष मेस्त्री, अंकिता सावंत, विजय चव्हाण (माजी सैंनिक), निलेश चव्हाण, दिपक चव्हाण, विलास बुवा, विजय भूवड, तुकाराम साळवी, अन्वर मोडक, विष्णूपंत सावर्डेकर, मैंनुद्दीन खलपे, पोलीस पाटील विनय साळवी, रविंद्र चव्हाण, अशोक चव्हाण, सुनिल चव्हाण, कॅप्टन मारुती चव्हाण, अनंत चव्हाण, रविंद्र चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, प्रदिप बुवा, प्रणय चव्हाण. प्रतिक चव्हाण, गौरव चव्हाण, सचिन पाटोळे, स्नेहा मेस्त्री, अर्चना चव्हाण, विजय बागवे, सुभाष सावंत, देवराज गरगटे, सुबोध चव्हाण, भागिर्थी चव्हाण, स्नेहा चव्हाण, दिनेश विचारे, संतोष राडे, उमेश राजेशिर्के, संतोष खैर, दिपक सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, गणेश भुवड, प्रकाश गुरव, शिवा चव्हाण, सुरेश कुंभार, मज्जिद मुल्लाजी, समिया मोडक, दिपक चव्हाण, सुधिर चव्हाण, भूषण वारे, पप्या होडे, विजय होडे, मारुती होडे, बंड्या मेस्त्री, संतोष सकपाळ, प्रभाकर चव्हाण, रमाकांत चव्हाण, अमोल सकपाल, आनंद चव्हाण, मिलिंद साळवी, मधु चव्हाण, महेश चव्हाण, ज्ञानेश भुवड, नरेश कदम, उदय चव्हाण, प्रकाश चव्हाण, देवा चव्हाण, रुपेश चव्हाण आदि पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.