संगमेश्वर | डिसेंबर १७, २०२३-
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली माभळे, ता. संगमेश्वर येथे महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी एक दिवसीय शिबीर संपन्न झाले. जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये यांनी ज्येष्ठ भाजपा नेत्या सौ. दिपीका जोशी यांच्या सहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राज फाऊंडेशन जालगांव, ता. दापोली यांच्या सहकार्याने आयोजित महिला कौशल्य प्रशिक्षणासाठी श्री. संतोष गाठे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मेणबत्त्या तयार करणे, फिनाईल तयार करणे, अगरबत्त्या तयार करणे आदी लघुउद्योग करण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण महिलांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी विधानसभा निवडणूक श्री. बाळासाहेब माने यांचे चिरंजीव मिहीर माने, संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, जिल्हा चिटणीस सौ. सरिता आंबेकर, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, अजिंक्यराज सुर्वे, सौ. सुमन झगडे, नवनियुक्त तालुका सरचिटणीस सौ. मुग्धा भिडे, सौ. पूर्वा करमरकर, माभळे ग्रा. पं. सदस्या सौ. शुभांगी जाधव, सौ. रोहिणी भोजने, बचत गट सीआरपी सौ. दीपा जोशी, नावडी बचत गट सीआरपी सौ. मनाली सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.