नालासोपारा : हा नरदेह परमार्थ साधण्याचे साधन आहे, असे समजून जीवन जगणारे वारकरी आज विठ्ठल विठ्ठल म्हणत विठ्ठल नामाचा गजराने संपूर्ण नालासोपारा दुमदुमला पश्चिम विभाग मध्ये सातत्याने हरिनामाचा वारसा जपणारे ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा 23 वा वर्धापन दिन निमित्त 19 वी भव्य दिव्या भजन सेवा आज मोरेगाव नालासोपारा येथे आयोजित करण्यात आली.
ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या १९ साव्या भजन स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. ब. प. सौ. स्नेहा भोसले (जेजुरी ) यांचे मंत्रमुग्ध आणि समाजप्रबोधन करणारे कीर्तन. हरि नामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवून भजन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन सुनिल कदम माऊली, अंकुश सावंत, तुकाराम सावंत, गणेश बुवा संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटिल, सचिव विनोद चव्हाण, खजिनदार कृष्णा सुर्वे सल्लगार धयालकर, शिवाजी भानत, प्रेमनाथ गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी जयराम पवार, विनोद बैकर, चंद्रकांत गुरव, राम उतेकर, जीवन मोरे आणि दीपेश शेडगे उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व वारकरी परंपरा जपण्याचे काम आज हि संस्था कामा करित आहे. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली सामजिक संस्था व श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (रजि.) या संस्थे सोबत सलग्न आहेत.