आता दिवा स्थानकात पश्चिमेलाही होणार सरकता जिना; पहा सविस्तर

Spread the love

दिवा : प्रतिनिधी दिवा पूर्वेला रेल्वे स्थानका बाहेर सरकता जिना सुरू झाल्यानंतर आता पश्चिमेकडील नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. लवकरच दिवा पश्चिम येथील तयार होत असलेला सरकता जिना हा देखील सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिली आहे. हा जिना लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून हा सरकता जिना येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होणार असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी सांगितलं. फलाट क्रमांक १ व २ वरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई दिशेकडे देखील एक स्वयंचलित सरकता जिना व्हावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केली जात होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने फलाट क्रमांक १ व २ वरील सरकता जिना सुद्धा मंजूर झाला असून त्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी
आज मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली. यावेळी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. आदेश भगत उपस्थित होते.दिवेकर रेल्वे प्रवाशांची गरज लक्षात घेता दिवा पश्चिमेतील सरकता जीना हा देखील लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करावा व फलाट क्रमांक १ व २ वरील नवीन सरकत्या जिन्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page