
रत्नागिरी / जनशक्तीचा दबाव /08 नोव्हेंबर- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सव गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी आयोजित करुन, त्याबाबतचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या.
तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासाचे योगदान या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत आज बैठक झाली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे, सदस्य डॉ. आनंद आंबेकर, विजय रानडे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सांस्कृतिक, कौशल्य विकास संकल्पना आधारित आणि युवा कृती या बाबींवर हा एकदिवसीय जिल्हास्तर युवा महोत्सव असणार आहे. याअंतर्गत समूह लोकनृत्य, वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादन असे याचे स्वरुप असणार आहे.