रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजपने, शिवसेना, राष्ट्रवादी, घटकपक्षांनी चांगले काम केले. संघाच्या जेष्ठांनाही मी धन्यवाद देतो. त्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला. परंतु महायुतीत असताना भाजपच्या जिल्हास्तरिय नेत्यांनी माझा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत त्यांच्या बैठका कुठे होत होत्या, काय कट शिजत होते हे सर्व माहिती होतं. आमच्याच तालमीत शिकलेली ती व्यक्ती असल्याने त्यांची झेप माहित होती. नाती जपण्यासाठी त्यांनी पक्षाच्या धोरणांशी बेईमानी केली. परंतु रत्नागिरी- संगमेश्वरमधील मतदारांनीच त्यांचा गेम केला आणि निवडुण आलो, असा थेट आरोप आमदार उदय सामंत यांनी भाजपच्या जिल्हास्तरिय नेत्यावर केला.
एमआयडीसीच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. सामंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळाले. निवडुण आल्यानंतर लगेचच मुंबईला जावं लागलं. त्यामुळे मतदारांचे आभार मानायचे राहिले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपापाल्या मतदारसंघात जाऊन मतदरांचे आभार माणण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच रत्नागिरी मतदारसंघाचा आभाराचा दौरा मी करणार आहे. मतदारांच्या ज्या विकासात्मक अपेक्ष आहेत. त्या पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. जी काही अपुर्ण कामं राहिली आहेत, ती पुर्ण करण्याचा मी त्यांना शब्द देतो.
एव़ढेच नाही, तर रत्नागिरी आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी पर्यटन आऱाखडा तयार केला जाईल. मी जो मतदारांना शब्द दिला आहे, तो पुर्ण केला जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचे चांगला फायदा झाला.
मतदारसंघाच्या 62 केंद्रांवर मला कमी मताधिक्य झाले. अल्पसंख्याक समाजाचा लोकसभेतील गैरसमज काही अंशी दुर करू शकलो. परंतु तो पुर्ण दूर होण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीसह आमच्या शिवसेनेने जोरदार काम केले. त्यामुळे महायुतीला यश मिळाले.
*माझा राजकीय गेम कोणी करू शकत नाही ज्यांनी गेम करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी त्यांचा गेम केला…*
परंतु भाजपमधील ज्यांनी काम केले नाही ते काल भाजपच्या व्यासपीठावर होते. माझ्या विरोधात काम करून काहींना शांत झोप लागत असेल तर ठिक आहे. परंतु महायुतीमध्ये राहून नाती जपण्यासाठी पक्षांच्या धोरणांची पायमल्ली होत असले तर त्याचा विचार होण्याची गरज आहे. पण ज्यांनी माझा राजकीय गेम करण्याचा कट रचला त्यांचा या निवडणुकीत मतदारांनी गेम केला, असे स्पष्ट बोट सामंत यांनी भाजपच्या जिल्हास्तरीय नेत्यावर ठेवले.
आम्हा दोन्ही भावांचा पराभव करण्याचे काहींचे मनसुबे होते. त्यांनी अनेक खटाटोप केले. परंतु मतदारांनी आम्हाला निवडुण दिले. उदय सामंत उपद्रवी नाही, चांगला वागतो, म्हणूनच हा विजय साध्य झाला. याची प्रचिती आठ दिवसात येईल. आमचा अस्त करणाऱ्यांना सांगतो की २००४ ला उदय झाला तो आता किरण सहित झाला आहे, असे सामंत म्हणाले. नाणार रिफायनरीबाबत आमची भुमिका स्थानिकांबरोबर असेल.
त्यांना प्रकल्प काय हे पटवुन देऊ. त्यांना हवा असेल तर होईल, नको असेल तर तसा विचार होईल, असेही सामंत म्हणाले.
*गुहागरात न जाता मी काय करू शकतो ते पाहिले: सामंत..*
गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेस बेंडल यांनी चांगले काम केले. भास्कर जाधव यांचा निसटता विजय झाला. मी रत्नागिरीत येऊन समोरच्यांचा सुपडासाफ करू, असे म्हणाऱ्यांनी मी गुहागरात न जाता काय करू शकतो हे पाहिल, असा टोला उदय सामंत भास्कर जाधव यांना लगावला. माझे त्यांच्याशी राजकीय तात्विक वैर आहे. कायमचे वैर नाही. त्यामुळे ते समोर आले तर आम्ही बोलणार असेही त्यांनी स्पष्ट केले. गुहागर परत जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.