संगमेश्वर बाजारपेठेतील युवकाला मारहाण प्रकरण
संगमेश्वर:- जमिनीच्या हिश्यावरून मारहाण करणाऱ्या संगमेश्वर बाजारपेठेतील युवकाला सहा महिन्याचा सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड देवरुख न्यायालयाने ठोठावला आहे.
याबाबत किशोर प्रभाकर लोध यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
निखिल रवींद्र लोध याने जमिनीच्या वादातून किशोर प्रभाकर लोध आणि प्रभावती लोध यांना मारहाण केली होती. भादवि कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस निरिक्षक उदय झावरे व पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संतोष झापडेकर यांनी तपास केला होता.
जमिनीच्या वादातून मारहाण करणाऱ्या निखिल रवींद्र लोध याला देवरुख न्यायालयाने सहा महिन्याची सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायायलयाने सुनावलेली आहे.
याप्रकरणी सरकारी वकील म्हणून एडवोकेट सुप्रिया वनकर यांनी युक्तिवाद केला.