नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्ती ्च्या प्रेरणादायी, नेतृत्वान, कर्तृत्वान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला!
लहानपणापासून आवड,व रियाज यामुळे कमी वयात अलंकार पदवीने निहाली गद्रे सन्मानीत!
कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे म्हणजे पुस्तकी ज्ञाना बरोबरच आपल्या आवडत्या क्षेत्रात डोकावून पाहिल्यास,त्या क्षेत्रातील व्यवहार्य, ज्ञान मिळवून पुढे जाणे क्रम प्राप्त ठरते.मग चित्रकला,वादन,नृत्य, गायन,दिग्दर्शन,संगीत अशा अनेक क्षेत्रांपैकी आपली आवड जोपासून,त्या विषयात पारंगत होणे,किंवा प्राविण्य मिळवून उत्तम यशस्वी होऊन खऱ्या अर्थाने करिअर संपन्न नक्कीच होता येते.हे अगदी सत्य करून दाखवणारी संगमेश्वर येथील कमी वयात अलंकार पदवीने सन्मानीत झालेली निहाली गद्रे!
निहालीचा जन्म १९९८ मध्ये संगमेश्वर येथे झाला.बालपण व प्राथमिक शिक्षण संगमेश्वर मध्येच झाले.ज्यांना कशाचेही भय नाही ,ते म्हणजे पिताश्री नावाने अभय! ज्या संगीत मार्गदर्शिका तेज व चमक आहे अशा मातोश्री दिप्ती! आयुष्यात पाठीराखा म्हणून ब्रह्म चैतन्य भाऊ म्हणजे ओम! नेहमीच्या वागण्यात व राहणीमानात निर्दोष व निष्पापपणा आहे ती म्हणजे खरीखुरी निघाली! अशा अनेक भरगच्च अर्थाने भरलेले एक आदरणीय, पूर्ण संस्कारी, व सज्जन कुटुंब म्हणजे निहाली गद्रे!
निहालीला गायनाची आवड लहानपणापासूनच तिच्या आईमुळे निर्माण झाली. आईचा आवाज मधुर व आईच्या मार्गदर्शनामुळे आपणही शिकूया, प्रयत्न करूया, अशा मानसिकतेने, व निश्चयाने लहानपणापासून निहाली गाण्याचा सराव करू लागली. गायनातील खरी गुरु , तिची आई म्हणजे दीप्ती वहिनी ! बारावी शिक्षण पूर्ण होईपर्यंत दररोज गायन सराव करत सूर आणि गळा परिपूर्ण केला.
देवरुख येथील ललित कला अकॅडमीत आई दीप्ती गद्रे स्वतः गायन शिक्षण घ्यायला जायच्या. त्यामुळे निहालीचे सुरुवातीचे ज्ञान तेथूनच मिळाले. त्यानंतर रत्नागिरी येथे गोगटे जोगलेकर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना,त्यावेळी गायन चालू ठेवून कोकणातील प्रसिद्ध गायिका मुग्धाभट सामंत, व कौशिकी चक्रवर्ती यांना गायनातील गुरु म्हणून सुरांचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरू केला. रियाजान तोअधिक चांगला होऊ लागल्यावर
निहालीने संगीताच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली.
निहालीचा पहिलाच गाण्यांचा कार्यक्रम इयत्ता नववीत असताना गोळवली येथील संगम गणेश मंदिरात करून आरंभ केला. हळूहळू सराव व धीर करत सद्धया “स्वर निहाली ” हा संगीत कार्यक्रम दोन ते तीन तासाचा सहज करू लागली. संगमेश्वर तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात विविध भागात गाण्याच्या मैफिली करून ग्रामीण भागात दडलेल्या सुरांना आधार देण्यासाठी उदात्त हेतूने निहालीने स्वतः गाण्याचे वर्ग सुरू केले. त्याचा परिणाम दोन विद्यार्थ्यांनी अमेरिकेतून संगीत वर्गाला प्रवेश घेतला होता. संगमेश्वर परिसरात होतकरू गीत कलाकारांना लहान वयापासूनच गायनाचे धडे निहाली मुळे घेण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे.
कमी वयात अलंकार पदवी मिळवण्यासाठी आई दीप्ती, वडील अभय, भाऊ ओम, मुग्धा भट सामंत ,कौशिकी चक्रवर्ती हे सर्व संगीताचे साथीदार असल्याचे प्रामाणिकपणे ती मानते. त्यामुळेच आवडीच्या क्षेत्रात संगीत विशारद, व अलंकार विशारद यशस्वी होतअसल्याने ती स्वतः समाधानी आहे.
शास्त्रीय संगीता सारख्या वेगवेगळ्या वाटेवर चालताना प्रथम आत्मविश्वास असायला हवा एखादी वेळ रियाज करण्याची मनाची तयारी हवी गुरुवर आढळत श्रद्धा असायला हवी यशाने हुरळून न जाता , शास्त्रीय संगीताचे शिक्षण हे कधी ही न संपणारी प्रक्रियाआहे. कायम लक्षात ठेवले पाहिजे.
ती स्वतःच्या या यशस्वी अनुभवामुळे इतर भगिनींना सांग इच्छीते की, जी आवड असेल ती मनापासून जोपासा. त्यात सातत्य ठेवा. कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीला अवघड वाटते किंवा कंटाळा येतो. परंतु त्याचवेळी सातत्य, सराव, जिद्द ठेवून आत्मविश्वास वाढवून एक आदर्श करियर संपन्न बना. असा मौलिक व अनुभवी सल्ला नक्कीच देते.
*▪️लेख शब्दांकन-श्रीकृष्ण खातू धामणी /संगमेश्वर/मोबा.नं. ८४१२००८९०९*