आँकलंड- जगात सर्वात पहिल्यांदा नववर्ष २०२४ चं सेलिब्रेशन न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात सुरू झालं आहे. ऑकलंड शहरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर रोषणाई आणि आतिषबाजीने देश उजळून निघाला आहे. न्यूझीलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतिषबाजी करत नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे.
आँकलंड शहरातील स्काय टॉवरवरून आकर्षक आतषबाजी करण्यात आली आहे. ३२८ मीटर उंच असलेल्या स्काय टॉवरवरून ही आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. बारा वाजण्यासाठी काही क्षण राहिले असताना काऊंटडाऊन देण्यात आलं. जसे बारा वाजले त्या क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.