साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी नवीन नियम; मोबाईल नंबरसह ओळखपत्राची सक्ती

Spread the love

साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी नवीन नियम; मोबाईल नंबरसह ओळखपत्राची सक्ती

शिर्डी :- शिर्डीच्या साईबाबांचे व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या साईभक्तांना आता साई संस्थानने मोबाईल क्रमांक व आधार किंवा मतदान कार्ड आयडी क्रमांकांची सक्ती केली आहे. भाविकांच्या मोबाईलवर संस्थानने पाठविलेल्या संदेशाची खात्री केल्याशिवाय दर्शन आरती मिळणार नसल्याने मोबाईल व आधार किंवा मतदान कार्ड क्रमांकाची सक्ती केली असून ही अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, काही एजंट दर्शन आरती पासचा काळा बाजार करीत असल्याच्या तक्रारी साई संस्थानकडे आल्या आहेत. काही प्रकरणाची चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी अशा रितीची योजना साई संस्थान राबवित आहे.
साईबाबा संस्थानला जे साईभक्त दान देतात, त्या दानाच्या टप्पे करून त्यांना साई संस्थानच्यावतीने दर्शन आणि आरती देण्यात येत असते. यासाठी संस्थान अशा दानशूर साई भक्तांना एक युनिक आयडी कार्ड देण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असले तरी दानशूर भक्तांनी ऑनलाईन दर्शन व आरती आरक्षित करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे समाधी व मूर्तीवर वस्त्र चढविण्यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने वस्त्र काढली जातात. यामध्ये देणगीदार यांना देखील वस्त्र चढविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
साई संस्थानच्या माध्यमातून एक नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही ठिकाणी एखाद्या भाविकांने साई मंदिरासाठी पाच एकर जागा दानाच्या स्वरूपात दिली. त्या ठिकाणी साई संस्थान स्वखर्चाने शिर्डीच्या धर्तीवर साई मंदिर बनवून शिर्डीत साई भक्तांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा दिल्या जातात त्या देण्यासाठी प्रस्तावित आहे. अथवा राज्यातील किंवा राज्याबाहेरील एखादी शासन मान्य सामाजिक किंवा धार्मिक संस्था आहे. अशा संस्थेस साई मंदिर बांधकामासाठी ५० टक्के रक्कम अथवा ५० लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे. ती संस्थान देईल मात्र त्यावर नियंत्रण हे साई संस्थानचे असेल. असे प्रस्तावित आहे. यावर साईभक्तांनी आपल्या सूचना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जगभरातील साई मंदिरांचे एक असोसिएशन स्थापन करण्यासाठी साई संस्थान विचाराधीन यावरही संस्थानने भाविकाकडून सूचना मागितल्या आहेत. यामाध्यमातून साई बाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार होणार आहे.
साई बाबा संस्थानच्या रक्तदानच्या विभागामार्फत रक्तदान शिबीरे घेतले जातात. त्यामाध्यमातून जे रक्त गोळा केले जाते. साईबाबा आणि साईनाथ रुग्णालयात जे रुग्ण असतील आणि त्यांना रक्ताची आवश्यकता असेल त्यांना साईनाथ रक्तपेढीमधून मोफत रक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रक्तदान करून रक्त मिळणार असे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली.
साई संस्थानने प्रस्तावित केलेल्या प्रस्तावावर साई भक्तांकडून सूचना मागण्यासाठी मेल आयडी ceo.ssst@sai.org.in या संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page