सोलापूर : सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दैनंदिन कचरा वाहतुकीसाठी CNG वर चालणारे नवीन ६ नग रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने खरेदी करण्यात आली असून आज दि.०८/०३/२०२३ रोजी हि वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत सदरची वाहने मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचेकडून खरेदी करण्यात आलेली आहेत.सध्या महानगरपालिकेकडे डीझेल वर चालणारे एकूण १४ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने कार्यरत होती त्यामधील ४ वाहने हि कंडम करण्यात येत असून सोलापूर शहरातील कचरा संकलन व वाहतूक सुरळीत चालावी याकरिता हि नवीन ६ वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत,ही नवीन घेतलेले ६ नग रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने ही १० टन लोड क्षमता असलेली असून या गाड्या CNG वर चालणाऱ्या असल्याने महापालिकेचे आर्थिक हित साधणार आहे प्रत्येक गाडीला १०० किलो CNG बसणाऱ्या २ टाक्या असणार आहेत.
व सदर गाडी १ किलो CNG मध्ये १० Km मायलेज देते त्यामुळे या गाड्या फायदेशीर आहेत.आज दि.०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी १०.३० वाजता महानगरपालिकेच्या आवारात मा.आयुक्त, शीतल तेली-उगले यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करण्यात आले.
त्यावेळी मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचेकडून मा.आयुक्त महोदया यांना प्रतीकात्मक चावी प्रदान करण्यात आली.या प्रसंगी अति.आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप,उपायुक्त विद्या पोळ,सहा.आयुक्त विक्रमसिंह पाटील,आरोग्याधिकारी बसवराज लोहारे,सफाई अधीक्षक (वाहन) नागेश मेंडगुळे, मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचे प्रतिनिधी अंबादास चन्ना,श्रीकांत आवताडे व म.न.पा.चे इतर अधिकारी उपस्थित होते.