संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नेत्रावती एक्सप्रेसला कर्नाटकमध्येच भटकळ स्थानकावर आजपासून (9 मार्चपासून) प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले आहेत.दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागील काही वर्षांपासून नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर रोड थांब्यासाठी आंदोलने करूनही रेल्वेने थांबा मंजूर केलेला नाही. यामुळे एकाच मार्गावरील दोन राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा दुजाभाव स्पष्ट झाला आहे.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) 9 मार्चपासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. परतीच्या प्रवासात म्हणजे तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावताना नेत्रावती एक्सप्रेस (16346) 9 मार्च 2023 पासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे थांबे देण्यात आले आहेत.
जाहिरात :