नेरळ: सुमित क्षीरसागर उपनगरीय रेल्वे स्थानकाने जोडलेल्या नेरळ रेल्वे स्थानक परिसर मागील काही महिने अमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनले होते. त्याबाबत नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करीत त्या टोळी मधील दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. नेरळ रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थ यांची विक्री जोरात सुरू असल्याची तक्रार नेरळ पोलीस यांच्याकडे येत होत्या.मागील महिन्यात नेरळ खांडा परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या वर कारवाई केली होती. तरीदेखील ती टोळी सक्रिय असल्याची खबर मिळताच 26 डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता नेरळ पोलिसांनी नेरळ स्थानकातील फलाट एक चे बाहेर असलेल्या निर्माण नगरी मध्ये सापळा रचून गाजांची विक्री करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यासाठी नेरळ बाजारपेठेतून नेरळ पोलिसांचे पथक प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे,कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शन घेवून आणि त्यांच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे,पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे,मंडलिक,सहायक फौजदार भिंगारे,पोलीस हवालदार अडीत,म्हात्रे, वाणी,पोलीस शिपाई कुमरे, बेले, दवणे, केकाण या पथकाने फलाटावरून चालत जावून ही कारवाई केली. त्यावेळी निर्माण नगरी मधील निर्माण प्लाझा इमारतीच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत सध्या कल्याण येथे राहणारा धर्मेंद्र कंचन चौहान,शिवासिंग बाकेलाल चौहान या दोघांना गांजाची विक्री करीत असताना ताब्यात घेतले. नेरळ पोलिसांनी अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या त्या दोघांना ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल चार किलो गांजा आढळून आला. खाकी रंगाची सेलो टेप लावलेली पाकिटे,ओलसर दमट उग्र वासाच्या काड्या,बिया, पाने या वस्तू बॅग मध्ये आणून विक्री करीत असताना ताब्यात घेतले.पोलिसांनी धर्मेंद्र याच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा 58 हजार रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेतला.पकडलेल्या अमली पदार्थ याचे वजन सरकारी पंच यांच्या उपस्थितीत वजन काटाधारक मुस्तफा जळगावकर यांच्याकडे केले असता ते वजन चार किलो दोन ग्राम भरले असून त्या अमली पदार्थाची बाजारभाव किंमत ही 48024 रुपये इतकी आहे.नेरळ पोलिसांनी चारही बाजूने सापळा रचून अमली पदार्थ यांची विक्री करणाऱ्या टोळी मधील दोघांना ताब्यात घेवून मुद्देमालासह अटक केली. अमली पदार्थ यांची विक्री करणाऱ्या त्या दोघांना कर्जत दिवाणी न्यायालयाचे पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्या दोघांवर एन डी पी एस अधिनियम 1995 चे कलम 8ए,20बी,आय आय बी,29 प्रमाणे कारवाई केली आहे.मात्र ते दोघे तरुण कोणाकडून अमली पदार्थ आणून त्याची विक्री करायचे याचा छडा नेरळ पोलीस कसा लावतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.तसेच नेरळ पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाई बद्दल पालक वर्गात समाधान पसरले आहे.