मोकाट गुरांचा अवघात होऊ नये म्हणून दानशूर लोकांकडून गळ्यामध्ये रेडियम पट्टे बांधले
मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर प्रशासनाने कारवाई करून गुन्हे दाखल करावेत
संगमेश्वर – भगवान श्रीकृष्ण यांच्या काळात गो मातेला मान होता. आणि आता काही ठीकाणी तिच्या कडे दुर्लक्ष होत आहे. गायी ला भारता मध्ये अनन्य साधारण महत्व आहे.भारतात गायी ला गो माता म्हणून संबोधले जाते आणि लोक देवत्व मानून पूजा करत असतात.परंतु हेच गो धन जेव्हा बेसहारा फिरत असतं ते बघून खूपच वाईट वाटतं.असच काहीसं संगमेश्वर मध्ये घडताना दिसतय.आज काल रात्री आपण संगमेश्वर परिसरात फेरफटका मारलात तर चाळीस ते पन्नास गुरं संपूर्ण संगमेश्वर मध्ये इतस्तः फिरताना आढळतात.वाहन चालकांच्या हॉर्न ला देखील न जुमानता रस्त्यात उभ्या असताना दिसतात.संपूर्ण संगमेश्वर मधील सिमेंट रस्त्यावर शेणाचा पो पडलेला असतो आणि त्याचा उग्र दर्प सगळ्या परिसरात येत असतो.हे पाहिलं की प्रथम दर्शनी वाटतं की यांना कोणी पालक नसेलच काय.
संगमेश्वरमध्ये सध्या मोकाट सोडून दिलेल्या गो माता रात्रीच्या अंधारात महामार्गावर उभ्या असतात. रस्त्या मध्ये मधोमध उभ्या असल्याने रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना न दिसल्या मुळे गाडी वरील ताबा सुटतो आणि वाहन चालकाची कोणतीही चुक नसतांना अपघात होतो.. गो माता व वाहन चालक जखमी होतात अथवा वाहनाचे नुकसान होताना आढळते.
असे अपघात होऊ नयेत म्हणून रेडिअम चे पट्टे गो मातेच्या गळ्यामध्ये काही ठीकाणी वापरले जातात. जर आपल्या कडे पण पट्टे वापरले तर महामार्गावर होणारे अपघात टळू शकतात अशा आशयाची पोस्ट मी काही दिवसांपूर्वी फेसबुक वर टाकली होती. काहींनी ही पोस्ट वाचून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.परंतु संगमेश्वरातील उत्साही युवा उद्योजक सिध्देश रमेश रहाटे यांनी ही पोस्ट वाचली आणि अशा प्रकारचे रेडिअम चे पट्टे कुठे मिळतात याची माहिती घेवून डायरेक्ट अॅमेझाॅन वर वीस पट्यांची आॅर्डर दिली देखील. पट्ट्यांची ऑर्डर डीलिव्हरी आल्यावर माझ्याकडे स्वतः आणून दिली आणि अजून कोणते सहकार्य लागणार असेल तर निसंकोच सांगा मी मदतीला तयार आहे असे सांगितले. मला अशा चांगल्या कामासाठी मदत करायला निश्चितच आवडते असा विश्वास दिला. खरंच मानले पाहिजे सिध्देशला.त्याला मुक्या प्राण्यांचे होणारे हाल समजून आले. गो मातेला आणि लहान वासरांना रेडिअम पट्टे लावल्या मुळे रात्रीच्या अंधारात चमकले आणि वाहनचालक सावध झाले तर रात्रीचे अपघात टळू शकतात. सध्या त्यांची ही मदत लाख मोलाची ठरत आहे. अपघाता मुळे मुक्या प्राण्यांचे होणारे हाल पाहून सिध्देश ने वेळीच दखल घेऊन सहकार्य केल्याने आज गो मातेंने जीव वाचू शकतात.सिद्धेश केलेल्या या मदती मुळे त्याचे जनमानसात कौतुक होत आहे. अशीच कायम त्याच्या हातून सेवा घडत राहू दे. अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
लायन्स क्लब,रोटरी क्लब यासारख्या सामाजिक संस्थानी पुढाकर घेऊन रेडियम चे पट्टे उपलब्ध करून दिल्यास गावातील युवक गो माता,वासरे व जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधायला तयार आहेत.
जीव माणसांचा असो नाहीतर मुक्या प्राण्यांचा प्रत्येकाचा जीव हा लाख मोलाचा आहे आणि तो वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे .तरच आपले जीवन सार्थकी लागेल.
आज रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांचे होणारे हाल बघून
तरी मालकांनी आपापली जनावरे घरी घेऊन जावीत.अन्यथा गो शाळेला जनावरे भेट द्यावीत निदान त्यांचा चांगला सांभाळ तरी गो शाळेत होईल.जनावर मालक अजून कीती अंत बघणार आहेत काय माहिती.
शासनाकडून वेळीच दखल घेऊन मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या आणि वासरांच्या मालकांवर जो पर्यंत मोठी दंडात्मक कारवाई होत नाही तो पर्यंत मोकाट गुरांमुळे होणारी अस्वच्छता आणि अपघात टळणार नाहीत.
काही जनावर मालकांनी आपल्या गाईंच्या नावावर कर्ज ही घेतली आहेत. काही गाईंच्या कानामध्ये माहिती साठी बिल्ला पण लावलेला दिसून येतो. त्या वरून मालक कोण आहे हे लगेच लक्षात येईल. तरी देखील या बिल्ले वाल्या गाई पण बिनधास्त पणे मोकाट सोडून दिलेल्या आढळतात.या जनावर मालकांना शासनाची भयभिती राहिलीच नाही असे वाटते आणि याचे खूप दुःख होते. खरच..,….
मालकांवर कोणी तरी अंकुश ठेवला पाहिजे तरच या गो धनाचे रक्षण होईल अन्यथा संगमेश्वर परिसरात असेअपघात आणि उग्र दर्प येणारी अस्वच्छता दिसतच राहील हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
जर या मोकाट जनावरांचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवायचा असेल तर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी जर पोलीस स्टेशनला विनंती केली आणि पोलीस यंत्रणे कडून सहकार्य मिळाले तर जनावर मालकांना चांगलाच धाक बसू शकेल.या मोकाट गुरांचे मालक कोण आहेत ही नावे पंचक्रोशीतील पोलीस पाटील देऊ शकतात.गुरांच्या मालकांना एकदा पोलीस स्टेशन ला बोलवून लेखी स्वरूपात समज दिली तर या जनावर मालकांना जरब बसू शकतो. काही दिवसांनी चारपदरी रस्ता चालू होणार आहे त्या वेळी तर वाहनांचा वेग जास्तच असणार आहे. मग अशी जनावरे रस्त्यावर आडवी आली तर मोठी जीवत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे तेव्हा वेळीच सावध होणे ही काळाची गरज आहे.
रेडिअम चे पट्टे गो मातेच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी नितीन (बाबु ) दिलीप शेट्ये
गुरुनाथ खातु , विनायक खातु , मुकेश भगत, अर्जुन माने, गणेश प्रसादे , यांनी मदत केली म्हणून हे शक्य झाले.त्यांचा ही आभारी आहे. आणि असेच सहकार्य कायम राहूदे
सिध्देश रहाटे यांचे विशेष आभार त्यांनी रेडिअम चे पट्टे उपलब्ध करून दिले म्हणून शक्य झाले.
संपर्क- अमोल अनिल शेट्ये, रामपेठ , संगमेश्वर.
मो नंबर. ७०३८७२२४२४