
पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी,अतिक्रमणे वाढल्याने पादचाऱ्यांना त्रास
संगमेश्वर- संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावर संगमेश्वर बस स्थानकच्या जवळ उभ्या करण्यात येत असलेल्या वेड्या वाकड्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून पादचारी तसेच प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवून वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संगमेश्वर ते कोल्हापूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते तसेच देवरुख या ठिकाणी संगमेश्वर तालुक्याचे शासकीय कार्यालय असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी संगमेश्वरवाशीय गर्दी करत असतात. मात्र या ठिकाणी लावण्यात येत असलेल्या वेड्या वाकड्या वाहनांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा या मार्गावरच रस्त्यावर गाडी थांबवून वाहन चालक जात असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी रस्त्यावरही अतिक्रमण वाढले असून ती काढून टाकण्यात यावीत यावीत जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यात मदत होईल.पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी वर्ग आणि ग्रामस्थांनी केली आहे. ओळी- संगमेश्वर देवरुख मार्गावर अशा प्रकारे गाड्या मध्येच लावण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते