🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | जानेवारी ३१, २०२३.
◼️ बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना मवारी शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केलं आहे.
◼️ नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवनीत व त्यांच्या वडिलांविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिवडी न्यायालयाने दोघांविरुद्ध चौथ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.