ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित यशवंतराव यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक पदी निवड…

Spread the love

ऱाजापूर /प्रतिनिधी- –
ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित यशवंतराव यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार ही जबाबदारी अजित यशवंतराव यांच्याकडे देण्यात आली आहे .

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील भाजप ,शिवसेना ,राष्ट्रवादी अन्य घटक तसेच आजी माजी खासदार ,आमदार जिल्हाध्य यांच्याशी संपर्क साधुन या लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासाठी  प्रचार यंत्रणा व जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार निवडुन यावा यासाठी  समन्वय साधावा अशा सुचना  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यान्नी त्या पत्रातुन दिल्या आहे त्या पत्राच्या प्रती भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे ,शिवसेनेचे प्रदेश सचीव संजय भाऊराव मोरे .राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव सिंधुदुर्गचे जिल्ह्याध्यक्ष अबिद नाईक यान्ना पाठविण्यात आल्या आहेत . 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page