मंडणगड(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना दिना’चे औचित्य साधून महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विष्णु जायभाये व ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन एन. एस. एस. च्या उद्दीष्टाची माहिती करुन दिली व स्वच्छतेचे महत्तव थोडक्यात सांगितले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव म्हणाले, की निरोगी वातावरणासाठी स्वच्छतेचे अधिक महत्तव असून आपण स्वच्छतेच्या बाबतीत फार दुर्लक्ष करतो. किमान ज्या ठिकाणी राहतो निदान तो परिसर तरी स्वच्छ ठेवायला हवा. संत गाडगेबाबा महाराज यांनी गावोगावी भटकंती करून स्वच्छतेचे महत्तव सांगितले, स्वतः हातात झाडू घ्यायचे आणि कृतितून समाजाला स्वच्छतेचे महत्तव पटवून द्यायचे. म्हणून विद्याथ्र्यांनी आपल्या बरोबर इतरांना स्वच्छतेचे महत्तव सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,एन.एस.एस. सर्व स्वयंसेवक-सेविका यांनी सहभाग घेतला होता.