अबू रोड – आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला चिंता तणावासह जीवन जगावे लागत आहे. प्रत्येकालाच अनेक समस्यांनी ग्रासले आहे.अशावेळी अध्यात्मिक आचार विचारातून जीवनाची नवी सुरुवात करावी लागेल. याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख ब्रह्मकुमारी डॉ. मोहिनी यांनी बोलताना केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मीडिया विंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाला आज गुरुवारी सायंकाळी प्रारंभ झाला.स्वस्थ आणि सुखी समाजासाठी अध्यात्मिक सशक्तिकरण आणि त्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर आधारित या संमेलनाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, ब्रह्माकुमारी प्रमुख बी,के.डॉक्टर मोहिनी, मीडिया विंगचे व्हाईस चेअरमन बी के आत्मप्रकाश, बी.के डॉक्टर नलिनी, मधुवन ग्रुपचे बी के सतीश, राष्ट्रीय समन्वयक मीडिया विंगचे बी.के निकुंज, बी के डॉक्टर सविता आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ब्रह्मकुमारी मोहिनी दीदी म्हणाल्या, मनातील दृढ संकल्पाने जीवनाचे ध्येय निश्चित करता येते. शांती हाच माणसाचा मूळ स्वभाव धर्म आहे. सकारात्मक विचार आणि निर्णयातून ध्येय प्राप्त करता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांनाही आपले समईच्छित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बि.के युगरातन (रायपुर) यांनी स्वागत गीत सादर केले. राजयोगा शिक्षिका निकिता यांनी शुभेच्छा दिल्या. काजोल डान्स ग्रुप (आग्रा) समूहाने स्वागत नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के चंदा यांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील या संमेलनाला देशभरातील हजारो पत्रकारांनी उपस्थिती दर्शवली आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी उद्घाटन समारंभात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक मंत्री जितीन प्रकाश जतिन प्रसाद, डॉक्टर राजयोगिनी डॉक्टर दीदी रतन मोहिनी, राजयोगिनी डॉक्टर लक्ष्मी, मीडिया विंगचे प्रमुख बी. के.करुणा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.