नरेंद्र मोदींच्या दोन मोठ्या घोषणा, नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंधुदुर्गात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाषण करताना मोदींनी दोन महत्त्वाच्या घोषणा केलं. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.

सिंधुदुर्ग | 4 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोकणात येऊन दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी आज पहिल्यांदा कोकण दौरा आहे. त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये राजकोट किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते आज करण्यात आलं. विशेष म्हणजे आज नौदल दिवस आहे. नौदल दिनाच्या निमित्तानेच आज विविध कार्यक्रमांचं आयोजन सिंधुदुर्गात करण्यात आलं आहे. या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्याआधी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यावेळी मोदींनी दोन मोठ्या घोषणा केल्या.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय…

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गाचं महत्त्व, तसेच सिंधुदुर्गातील किल्ल्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी दोन मोठ्या घोषणा केली. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

नरेंद्र मोदी मोठी घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?..

“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आज भारत गुलामीच्या मानसिकताला मागे सोडून पुढे जात आहे. मला आनंद आहे की, आमचे नौदलाचे अधिकाऱ्यांच्या वर्दीवर छत्रपती शिवाजी महाराजांची झलक बघायला मिळेल. हे माझं भाग्य आहे की, नौदलाच्या ध्वजावर मला गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मला अजून एक घोषणा करताना आनंद होत आहे. भारतीय नौसेना आपल्या रँक्सचं नामकरण भारतीय परंपरेच्या अनुसार करणार आहे”, अशा घोषणा नरेंद्र मोदी यांनी केल्या.

“आम्ही सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यावर जोर देत आहोत. मी नौदलाचं अभिनंदन करतो की, तुम्ही नेव्हल शिफमध्ये पहिली महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आजचा भारत आपल्यासाठी मोठे लक्ष्य निश्चित करत आहे. ते मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती लावत आङे. भारताजवळ या लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी एक मोठी ताकद आहे. ही ताकद 140 कोटी भारतीयांच्या विश्वासाची आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी आपल्या भाषणात आणखी काय-काय म्हणाले?

“आज ४ डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आपल्याला आशीर्वाद देतो की, सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला. मालवण तारकल्लीचा हा सुंदर किनारा, चारही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप पसरलेला आहे. त्यांच्या विशाल प्रतिमेचं अनावरण आणि तुमच्यासाठी हुंकार प्रत्येक भारतीयाला जोशाने भरत आहे. तुमच्यासाठीच म्हटलं गेलं आहे की, चलो नयी मिसाल हो, बडो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नही, बढे चलो. मी नौदलाच्या परिवाराच्या सर्व सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छा दितो. मी आजच्या दिवशी त्या शूरवीरांना प्रणाम करतो ज्यांनी मातृभूमीसाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलंय”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणात कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर यांचा उल्लेख..

“सिंधुदुर्गाच्या भूमीवरुन आज नौदल दिनाच्या शुभेच्छा देणं ही खूप मोठी घटना आहे. सिंधुदुर्गाच्या ऐतिहासिक किल्ल्याला पाहून प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरते. कोणत्याही देशासाठी समुद्र सामुग्री किती महत्त्वाची आहे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो तो सर्वात शक्तीमान आहे. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली. कान्होजी आंग्रे असतील, मायाजी नाईक भाटकर असतील, असे अनेक योद्धा आजही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. मी आज नौसेना दिवसानिमित्ताने देशाच्या या वीरांना प्रणाम करतो”, असं मोदी म्हणाले.

“काल तुम्ही चार राज्यांमध्ये याच ताकदची झलक पाहिली. लोकांची भावना, आकांक्षा जुळते तेव्हा किती सकारात्मक परिणाम समोर येतात. वेगवेगळ्या राज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. पण सर्व राज्यांचे लोक राष्ट्र प्रथम या भावनेने ओतप्रोत आहे. देश आहे तर आम्ही आहोत. देश पुढे जाणार तर आम्ही पुढे जाणार, अशीच भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे”, असं मोदी म्हणाले.

‘भारताचा इतिहास फक्त 1 हजार वर्षाच्या गुलामीचा नाही’

“लोकांनी नकारात्मकतेच्या राजकारणाचा पराभव करुन प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा पण केला आहे. हाच पण आपल्याला विकसित भारताकडे नेत आहे. हाच पण देशाला तो गौरव देणार ज्याचा हा देश नेहमी हक्काचा आहे. भारताचा इतिहास फक्त 1 हजार वर्षाच्या गुलामीचा नाही. भारताचा इतिहास विजयाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास शौर्याचा इतिहास आहे. भारताचा इतिहास ज्ञान, कला, कौशल्याचा, समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे”, असं मोदी म्हणाले.

‘एकेकाळी सुरतच्या बंदरावर 80 पेक्षा जास्त देशाचे जहाज असायचे’..

“शेकडो वर्षांपूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा आम्ही सिंधुदुर्गात किल्ले बनवले. एकेकाळी सुरतच्या बंदरावर 80 पेक्षा जास्त देशाचे जहाज राहत होते. भारताच्या याच सामर्थ्याच्या आधारावर दक्षिण पूर्व आशियाच्या देशांनी आपला व्यापार वाढवला. विदेशी ताकदांनी आक्रमण केलं तेव्हा आपल्या संस्कृतीवर निशाणा साधला. जो भारत जहाज बनवण्यात प्रसिद्ध होता त्याची कला, कौशल्या सर्व काही ठप्प करण्यात आलं. भारत आता विकसित होण्याच्या लक्ष्यावर जात आहे, आल्याला आपल्या गौरवाला परत आणायचं आहे. आमचं सरकार प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. भारत ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहे. अवकाश आणि समु्द्रात जगाला भारताचं सामर्थ्य दिसत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page