KDMC साहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, बेकायदा बांधकामे रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी

Spread the love

दबाव वृत्त :

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी सोमवारी शासन सेवेतून आलेल्या तीन महिला साहाय्यक आयुक्तांच्या प्रभागातून बदल्या केल्या आहेत.

तत्कालीन आयुक्तांनी स्नेहा करपे, सोनम देशमुख, प्रीती गाडे यांना ह, ग आणि अ प्रभागात नियुक्ती दिली होती. जिल्हा नियोजन विकास समितीकडून आलेल्या साहाय्यक आयुक्त निवेदिता पाटील यांनी वेळोवेळी राजकीय दबाव आणून प्रभागात काम करण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आहेत. याऊलट आयुक्तांवर एका लोक-प्रतिनिधीच्या स्वीय-साहायकाचा दबाव आणून चांगली पदस्थापना मिळविण्यात त्या सतत प्रयत्नशील असल्याची पालिकेत चर्चा सुरू आहे.

डोंबिवली ग प्रभागात यापूर्वी धडाकेबाज काम करणाऱ्या करपे यांची बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात साहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त होते. पोलिस सवरक्षण मिळत नाही, इमारतीत रहिवाशी, अशी किरकोळ कारणे देऊन त्या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्या. ह प्रभागाचे अधीक्षक अरूण पाटील प्रभागातील बेकायदा बांधकामांची माहिती देत नसल्याने करपे यांनी पाटील यांना नोटीस बजावली होती.

बेकायदा बांधकामे रोखण्यात यापूर्वी अपयशी ठरलेले साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना क प्रभाग, ब प्रभागाचे साहा्य्यक आयुक्त राजेश सावंत यांना ह आणि ग प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ह, ग प्रभागांमध्ये निवेदिता पाटील, सुषमा मांडगे यांना नियुक्ती देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. देशमुख यांच्याकडे ब प्रभाग साहाय्यक आयुक्त, करपे यांच्याकडे भांडार, क्रीडा, गाडे यांना घनकचरा विभागात पदभार देण्यात आला आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page