मंडणगड(प्रतिनिधी) : येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे सुर्ले ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे दिनांक 17 ते 23 डिसेंबर 2024 या कालावधीत ‘श्रमसंस्कार निवासी शिबीर’ संपन्न होणार आहे. शिबीर कालावधीत संपूर्ण गावाची स्वच्छता, जलसंधारण, आपत्ती व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृश्टिने ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न केले जाणार असून या शिबिरामध्ये एकूण 50 विद्याथी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
दि. 17 रोजी दुपारी 3.30 वाजता सदर शिबीराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडणगडचे तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे तसेच विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, सुर्ले गावच्या सरपंच सौ. रोशनी दिवेकर,श्री. लक्ष्मण मोरे, श्री. कल्पेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
शिबीर कालावधीत दि. 18 रोजी मंडणगडचे पोलीस निरीक्षक श्री नितीन गवारे – सायबर सुरक्षा, दि. 19 रोजी वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे – आपले आरोग्य, दि. 20 रोजी पत्रकार अॅड. दयानंद कांबळे – ग्रामीण पत्रकारिता, दि. 21 रोजी डॉ. सुभाष सावंत – लोकसहभागातून ग्रामीण विकास, दि. 22 रोजी मोहन उपाध्ये – कासव संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पथनाटय व समुहगीते आदींच्या माध्यमातून पर्यावरण व आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी शिबीर करण्यात येणार आहे. या कालावधीत वनराई बंधारा बांधणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, रस्ता दुरूस्ती आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता शिबिराचा सांगता समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ. संपदा प्रेमकुमार पारकर हया उपस्थित राहणार आहेत तर विशेष उपस्थिती पंचपायत समिती मंडणगडचे गटविकास अधिकारी श्री. विशाल जाधव हे असणार आहेत. संस्था पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सांगता कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ.वाल्मिक परहर, जिल्हा समन्वयक डॉ.राहुल मराठे, कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, सल्लागार समिती सदस्य श्री. आदेश मर्चंडे, श्री. गिरीश जोशी , डॉ. धनपाल कांबळे, डॉ. सूरज बुलाखे विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुराज पवार व आर्या कदम तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती प्रयत्न करीत आहेत.