बीजिंगला मागे टाकत मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी; मुकेश अंबानी पुन्हा नंबर वन…

Spread the love

अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आता आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूयॉर्कनंतर मुंबई अब्जाधीशांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क हे 119 अब्जाधीश असलेले शहर आहे. 97 अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या मुंबईत 92 अब्जाधीश आहेत.

बीजिंगमध्ये एका वर्षात 18 नवीन करोडपती बनले आहेत. आता बीजिंगमध्ये फक्त 91 अब्जाधीश उरले आहेत आणि ते जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या स्थानावर 87 अब्जाधीशांसह शांघाय आहे. भारत चीनसारखा कधीच बनू शकत नाही, असं का म्हणाले रघुराम राजन?

मुंबईतील सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती 445 अब्ज डॉलर आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% अधिक आहे. तर बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 265 अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 28 टक्के कमी आहे. मुंबईत ऊर्जा आणि फार्मास्युटिकल्ससारख्या क्षेत्रातून पैशांचा पाऊस पडत आहे. मुकेश अंबानींसारखे अब्जाधीश यामध्ये प्रचंड नफा कमावत आहेत.

रिअल इस्टेटमध्ये मंगल प्रभात लोढा आणि कुटुंब मुंबईतील सर्वात जास्त संपत्ती मिळवणारे अब्जाधीश आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे ते 10 व्या स्थानावर आहेत.

त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने ते जागतिक स्तरावर 15व्या स्थानावर आहेत. HCL चे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 स्थानांनी झेप घेत ते 34व्या स्थानावर पोहोचले आहेत.

गौतम अदानींनी आणखी एक पोर्ट घेतले विकत; 3,080 कोटींना झाला करार, शेअर्समध्ये वाढीचे संकेत
याउलट, सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला यांची एकूण संपत्ती घसरून 82 अब्ज डॉलर झाली. ते 9 स्थानांनी घसरून 55व्या स्थानावर आले आहेत. दिलीप सांघवी (61 वे स्थान) आणि सन फार्मास्युटिकल्सचे कुमार मंगलम बिर्ला 100 व्या स्थानावर आहेत. या अब्जाधीशांमुळेच मुंबईने आज अब्जाधीशांच्या शहराच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page