
डिजीटल दबाव वृत्त
महाराष्ट्र मुंबईचा मराठीशी आणि मराठी भाषकांशी संबंध उरलेला नाही का? काही जण त्वेषाने आणि मुठी आवळून गर्जतील, मुंबई मराठी माणसाचीच आहे. या महापालिकेची भाषा मराठी आहे. दुकानांवर मराठीतून बोर्ड लावण्याची सक्ती आहे. बेस्ट बसेसवरच्या पाट्या मराठीत आहेत आणि हुतात्मा चौकाजवळ कोरण्यात आलेल्या १०५ हुतात्म्यांपैकी बहुतेक नावे मराठी भाषकांचीच आहेत. हे सारे खरे आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब ही, की मुंबईच्या २२७ नगरसेवकांपैकी बहुसंख्य मराठी भाषक आहेत. ३४ आमदारांमध्येही बहुसंख्य मराठी आडनावेच दिसतील. सहापैकी दोन खासदार मराठी आहेत. सर्व राजकीय पक्षांचे मुंबईचे अध्यक्ष मराठी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (सध्या तरी!) आणि महापौरही मराठी आहेत. येणारा काळ हा अमराठी भाषिकांचा असेल दुर्दैव शहराचे मराठीपण हरवले आहे, हे वास्तव मान्य करावे लागेल :- रवींद्र कुवेस्कर

• मराठी माणसाचे हुकमी व्यवसाय, आणि मराठी माणसाची सध्याची झालेली पिछेहाट...
मराठी माणसाचे हुकमी व्यवसाय. तिथेही कमालीची पीछेहाट. सोने, जवाहिराच्या व्यवसायातील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकी नावे वगळली, तर हा श्रीमंती व्यवसाय अन्य भाषिकांच्या ताब्यात केव्हाच गेला. भाजी आणि भय्या हे समीकरण बनल्यालाही आता कित्येक वर्षे लोटली. रत्नागिरीचे हापूस आंबे विकण्यासही दारात भैया येऊ लागला आणि आपण बिनदिक्कतपणे त्याच्याकडून हापूस घेऊ लागलो. मुंबईतील मच्छिमार समाज, तिथल्या कोळणी आणि त्यांचे टेचातले वागणे, यावर अनेक चित्रपट आणि नाटकांना विषय मिळाले. ससून डॉक्सपासून ठाण्याच्या खाडीपर्यंतच्या या कोळणी कुठे गेल्या? ‘ताजे मासे’ जाऊन ‘ताजी मछली’ कशी आली? केसांवर आणि कपाळावर ओघळणारे बर्फाचे पाणी टिपत बांबूच्या टोपलीतून ‘मावरं’ आणणाऱ्या कोळणींची जागा अॅल्युमिनियमच्या घमेल्यातून ‘मछली’ आणणाऱ्या बिहारी मुसलमानाने घेतली आणि त्याच्याकडे मासे स्वस्त मिळतात, यावर आपणही खूश झालो. बिहारींना होलसेलने मासे विकले, की बाजारात दिवसभर बसण्याचे किंवा दारोदार फिरण्याचे कष्ट नकोत, म्हणून मच्छिमारांनीही आपला परंपरागत धंदा विकला.
• स्थानिक म्हणतो मासे व्यवसायाला उतरती कळा… परप्रांतीय म्हणतो मराठी माणसा व्यवसायातून पळा
:- समित कुमार यादव.

टॅक्सी आणि रिक्षा हे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य घटक असताना. त्यावर उत्तर भारतीयांचीच सत्ता आहे, ह्याला कारणीभूत कोण? शहर आणि उपनगरांत फूटपाथ अडवून बसलेले फेरीवाले परप्रांतीयच आहेत. हार्बर लाइनला लागून झालेल्या झोपड्यांपासून धारावी, कुर्ला, दिवा, डोंबिवली, कोपर,चेंबूर, बोरिवली, मिरारोड,मानखुर्द, मालाड इथे सर्वत्र दररोज वाढणारी झोपडपट्टी आणि त्यातील प्रजा मुंबई बाहेरच्यांचीच. याला कोण जबाबदार ? एकगठ्ठा मतदान बुडायला नको, म्हणून झोपड्यांचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावणारे गुप्ता, शर्मा, दुबे, पांडे, त्रिपाठी, सिंग हे आणि असे मराठी भाषिकांनी निवडून दिलेले राजकारणी याला जबाबदार आहेतच; पण यांना कायदेशीर संमती देण्यास मदत करणारी स्थानीक मराठी माणसेच. झोपडपट्टीवाल्यांना अधिकृत दर्जा मिळण्यासाठी रेशन कार्डे लागतात. खोटे पुरावे देऊन ही कार्डे तयार होतात. शिधावाटप कार्यालयांत अल्प मोबदल्यात ही कामे करून देणारे कर्मचारी मराठी. रस्त्यावर जागा अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना लायसन्स देणारे महापालिकेच्या वॉर्डातील कर्मचारीही मराठी आणि रिक्षावाल्यांना बिल्ले करून देणारे पोलिस व वाहतूक खातेही मराठी माणसांचेच. त्यांच्याकडून ही
कामे करवून घेणारे नगरसेवक, आमदार व मंत्रीही
मराठीच पुढाऱ्यांनाआपणच निवडून देतो ना!! दोष द्यायचा कुणाला?
:- धर्मेंद्र घाग (अध्यक्ष) महाराष्ट्र संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य

• मराठी माणसाची अधांतर अवस्था.
मराठी माणसाची अधांतर अवस्था ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. मराठी भाषकाने मराठीची कास सोडून परकीय भाषा जवळ केली. पण स्वतचं कोणत्याही एका भाषेवर प्रभुवत्व नाही. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था सध्याच्या स्थितीला आहे :- प्रमोद मसुरकर, मी मराठी एकीकरण समिती,महाराष्ट्र वाचवा कृती समिती


जाहिरात


अधिक माहितीसाठी संपर्क करा.


जाहिरात

