मुंबई: जगाच्या नकाशावर असलेल्या महागड्या घरांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर झेपावले आहे. आजवर जगातील महागड्या शहरांच्या यादीत मुंबई शहराचा क्रमांक १८वा होता. मात्र, गेल्या वर्षभरात मुंबई शहरातील घरांच्या किमतीमध्ये साडेसहा टक्क्यांनी वाढ
मुंबई नगरीचे वाढते महत्त्व
- मुंबईत झालेली दरवाढ ही शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे शहराचे महत्त्व वाढत असल्याचे द्योतक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
- चालू वर्षात अनेकजण लहान घराकडून मोठ्या घरांच्या विक्रीकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
- चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहरात एक लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी झाली आहे.
- यामध्ये निवासी मालमत्तांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. तर, या ८२ टक्क्यांपेक्षा १८ टक्के घरांच्या किमती या कोट्यवधींच्या घरात आहेत.
दरवाढीचे वैशिष्ट्य…
मुंबई शहरातील दरवाढीचे वैशिष्ट्य म्हणजे, मुंबई व परिसरात आजच्या घडीला न विकल्या गेलेल्या घरांची संख्या लक्षणीय आहे. याचाच अर्थ मागणीपेक्षा पुरवठा अधिक असला तरी मुंबईच्या किमतीमध्ये कपात झालेली दिसत नाही. तसेच, अशा स्थितीत मुंबईचे दर स्थिर असणे अपेक्षित होते,
जाहिरात