दिवा : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा
मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
करण्यात आल्या आहेत. शहर संघटिका – ज्योती पाटील ( दिवा शहर), कल्याण विधानसभा संघटिका – योगिता नाईक (दिवा शहर), उपशहरप्रमुख तेजस पोरजी (प्रभाग क्रमांक २७), महिला
विभाग संघटिका – मयुरी पोरजी (साबे विभाग) यांच्या नियुक्त्या
करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
• खरी….शिवसेना कोणाची.
शिवसेना दोन गटात विभागली गेली. दोन्ही गटात किंवा पक्षात शिवसेना प्रमुख एकच आहेत. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. एका गटाचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्त्व मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पक्षासाठी न्यायलयीन लढाई आणि निवडणूक आयोगाची लढाई जिंकण्यात कोणत्या पक्षाला यश आले माहीत नाही. परंतु सद्याची सत्ता स्थिर आहे? असा प्रश्न सामान्य मतदार करीत आहेत. परकीय मुल कडेवर दत्तक घेवून त्याला पितृत्वाचे नाव दिले जात नाही :- सौ.योगिता नाईक :- कल्याण ग्रामीण संघटीका उ.ठा.बा
• आता प्रश्न उपस्थित होतो तो पुढे काय? येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला सामान्य मतदार स्वीकारणार का
• दिव्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय
१९ जून १९६६ हा शिवसेनेचा स्थापना दिवस आणि २१ जून २०२२ हा शिवसेनेतील बंडाचा आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेल्या नवीन नेतृत्त्वाचा दिवस. या दोन्ही तारखांची नोंद शिवसेनेच्या इतिहासात आता कायमस्वरुपी महत्त्वाची आहे.
एकाबाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट यांच्यासमोर शिवसेनेचं नेतृत्त्व म्हणून आपली प्रतिमा भक्कम करणं आणि आपल्या नेतृत्त्वातील शिवसेना पक्षाचं बळ वाढवणं हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आदेश आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे मत सौ.योगिता नाईक यांनी दबावच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
जाहिरात
जाहिरात