आ. निरंजन डावखरे यांच्या फंडातून लांजा-राजापूरमधील शाळांना शै. साहित्य वाटप. निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी मानले आभार.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | राजापूर | डिसेंबर १२, २०२३.

“राजापूर विधानसभेतील राजापूर व लांजा तालुक्यातील माध्यमिक व इतर १७ शाळांना विधान परिषद सदस्य, आ. ऍड. निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून संगणक व प्रोजेक्टर या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. याबद्दल भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी त्यांचे आभार मानते.” असे सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी प्रतिपादन केले. येत्या रविवारी, १० डिसेंबर रोजी आ. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ८० शाळांना साहित्य ड्राईव्ह-इन लॉन्स संगमेश्वर येथे सन्मानपूर्वक  वितरण करण्यात येणार आहे.

“राजापूर विधानसभेतील अनेक शाळा ग्रामीण भागात असून आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आवश्यक असणारे संगणक संच, प्रोजेक्टर आदी गोष्टींची अद्याप कमतरता आहे. कोकणातील विद्यार्थी हुशार असून गेली अनेक वर्षे १० वी, १२ वी च्या बोर्ड परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. अशात त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने असे साहित्य उपलब्ध करून देऊन ज्ञानाच्या अथांग सागरात मुक्त विहार करण्याचे आशीर्वाद आणि प्रेरणा विद्यार्थ्यांना यानिमित्ताने मिळणार आहे.” असे त्या पुढे म्हणाल्या.

साहित्य वाटपासाठी निवड झालेल्या लांजा तालुक्यातील शाळा पुढीलप्रमाणे :-

श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा, मु.पो. खावडी; श्री. आदिष्टी विद्यामंदिर मु.पो. गोविळ; श्री नवलादेवी विद्यामंदिर मु.पो. खानवली; श्रीराम विद्यालय व तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, वेरवली; बॅ. नाथ पै विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हर्चे; न्यू इंग्लिश स्कूल वानगुळे; आदर्श विद्यामंदिर, प्रभानवल्ली; जि.प. शाळा नं. १, शिपोशी; जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डाफळेवाडी; श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे; भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेड; गोविळ शिक्षण प्रसारक मंडळ, गोविळ; जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४, देवधे; राजाराम सीताराम बेर्डे माध्यमिक विद्यालय व कै. सौ. श्रुतिका यदुनाथ बेर्डे कनिष्ठ महाविद्यालय, साटवली; उर्मिला माने विद्यालय, आसणे.

साहित्य वाटपासाठी निवड झालेल्या राजापूर तालुक्यातील शाळा पुढीलप्रमाणे :-

श्रीमती उमाताई परुळकर माध्यमिक विद्यालय मु.पो. वडवली; नवजीवन हायस्कूल, राजापूर; मॉडर्न उर्दू हायस्कूल नाटे; नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन, सागवे; कै. सि. ना. देसाई (टोपीवाले) विद्यामंदिर, नाणार; गुरुवर्य द. ज. सरदेशपांडे, अध्यापक विद्यालय राजापूर कोदवळ; श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर मु.पो. अणसुरे; ताम्हाणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माध्यमिक विद्यामंदिर, मु.पो. ताम्हाणे; श्री गांगेश्वर विद्यामंदिर ससाळे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page