
स्पर्धेसाठी २ लाख रुपयांच्या बक्षीसांची होणार लयलूट..
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या मान्यतेने रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त खासदार श्री २०२५ आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री २०२५ या भव्यदिव्य अशा शरीरसौष्ठव स्पर्धा भरवण्यात येत आहेत. या स्पर्धा वजनी गटात घेण्यात येणार असून रत्नागिरी जिल्हा मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धा शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर लक्ष्मीचौक मैदान, गाडीतळ रत्नागिरी येथे सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण २ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची लयलूट होणारी ही नेत्रदीपक स्पर्धा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वैभव कांबळे, मोबाईल : ७७७५०११२२२, अमोल जाधव, मोबाईल : ९९२२४८९०६५, संदिप नाचणकर, मोबाईल : ८९२५२६९९९९, इरफान काद्री, मोबाईल : ८२७५४३३०४५ यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.