पुणे – राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या परतीच्या प्रवासात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मात्र, कोकण आणि गोवा वगळता इतर जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे.
दरम्यान, ६ तारखेनंतर उष्णतामान वाढणार असल्याचे माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
सध्या मान्सूनचे वारे दक्षिण कोकण गोव्यावर आहेत. त्यामुळे दक्षिण कोकण गोव्या व्यतिरिक्त राज्यात इतर जिल्ह्यात वातावरण प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. आज पासून मॉन्सून उत्तर मध्य महाराष्ट्रतून माघारी फिरणार आहे.
आज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. पुण्यात पुढील ४८ तासात वातावर अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.