मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक…; हसन मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा…

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकारण रंगले आहे. समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेमध्ये पालकमंत्री हसनस मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुराळा उडाला आहे. कागल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ॲड सुरेश कुराडे यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी मोडक्या लॅम्ब्रोडर स्कूटर वरून फिरणारे हसन मुश्रीफ पाच हजार कोटींचा मालक कसे बनले. त्यांचा हा प्रवास डोळे पांढरे करणारा असून याचे उत्तर मुश्रीफांनी जनतेला द्यावे. त्यांचा ही मोहमाया सर्वसामान्याना विचार करावयास लावणारा आहे, असा घणाघात सुरेश कुराडे यांनी केला आहे.

भादवण (ता.आजरा) येथे आयोजित महाविकास आघाडीच्या उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ॲड कुराडे म्हणाले,”स्व. सदाशिव मंडलिक यांनी आपल्या मुलाला बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना आमदार, मंत्री केले. पण या पट्ट्याने त्यांच्यासह विक्रमसिंह घाटगे,बाबा कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचा विश्वासघात केला. असा हा गद्दार प्रतिनिधी या निवडणुकीतून बाजूला करूया. आता जागे व्हा आपण मराठे आहोत. सर्वजण शिवरायांचे मावळे आहोत. गनिमी काव्याने समोरच्या मोघलशाहीचा सुपडासाफ करूया. आणि स्वराज्याची नवी क्रांती घडवूया,” असे आवाहन सुरेश कुराडे यांनी केले.

प्रियांका गांधी यांच्या रोड शोत काँग्रेस-भाजप आमने-सामने; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी.

या प्रचारसभेमध्ये  समरजीतसिंह घाटगे म्हणाले, “गावांगावातील बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफांचा डाव उधळून लावा. मुश्रीफांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर ठराविक लोकांची दंडेलशाही, हुकूमशाही सुरू केली आहे. माय बाप जनतेने स्वतः निर्णय स्वतः घेऊन या निवडणुकीत मतदान करावे.  कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. भयमुक्त लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे. पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले. त्यांची सर्वाधिक पाठराखण उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे. एक वेळ मला संधी द्या. तुमचा विकास, तुमचे परिवर्तन पुढार्‍यांच्या हातात देऊ नका. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि या परिवर्तनाची पाठराखण करा,” असा घणाघात समरजीतसिंह घाटगे यांनी केला.

पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांचा मोठा कारनामा; बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार केल्याचा आरोप..

पुढे ते म्हणाले की, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता मुश्रीफांना दिली. मात्र त्यांनी युवकांना बेरोजगार व व्यसनाधीन करून एक पिढी बरबाद केली. सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला याचा महिलांनी विचार करावा,” असे मत समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.

हा कसला पळपुटा पालकमंत्री..

“ईडी कुणाच्याही मागे लागत नाही. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करण्याच्या मागे ईडी लागते. मुश्रीफांनी शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यहार केला म्हणूनच त्यांच्या मागे ईडी लागली. ईडी दारात आल्यावर मागच्या दाराने पळून जाणारा हा कसला पळपुटा पालकमंत्री,” अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भोकरे यांनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page