गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाच्या आनंदात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १५६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा पुतळा बनवला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी २० ते २५ जणांच्या टीमने ३ महिने मेहनत घेतली. या मूर्तीची किंमत सुमारे ११ लाख रुपये आहे.
राधिका चेन्सचे मालक बसंत बोहरा यांनी सांगितले की, १८ कॅरेट सोन्याने बनवलेल्या मूर्तीचे वजन १५६ ग्रॅम आहे, कारण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेत भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या होत्या. मोदींचा हा पुतळा विकत घेण्यासाठी अनेक जण स्वारस्य दाखवत आहेत, मात्र ज्वेलरने अद्याप तो विकण्याचा निर्णय घेतलेला नाही.
बोहरा म्हणाले, “मी नरेंद्र मोदींचा चाहता आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ काहीतरी बनवायचे ठरवले. सुमारे २० कारागिरांना आमच्या कारखान्यात ही मूर्ती बनवण्यासाठी सुमारे तीन महिने लागले. या मूर्तीची कोणतीही निश्चित किंमत नाही, कारण ती सध्या विक्रीसाठी नाही. पीएम मोदींचा सोन्याचा पुतळा पाहून लोक सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.