
महाराष्ट्र: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार-पाच वर्षांपासून आंदोलनं करत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ते दुसऱ्यांदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील हे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उपोषणाला बसले होते. तेव्हा राज्य सरकारच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देत उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, राज्य सरकारने ही मुदत पाळली नाही.
मनसेने मराठा आंदोलकांना दिला संदेश…
गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये! गड्यांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. आरक्षणाची मोहीम फत्ते होईपर्यंत या निगरगठ्ठ नेत्यांपुढे आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र – मनोज जरांगे पाटील खर्ची पडता कामा नये

त्यामुळे जरांगे पाटील हे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खूप खालावली आहे. त्यामुळे राज्यभरातून राज्य सरकारबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जरांगे यांच्या प्रकृती बाबत चिंता व्यक्त करत मराठा आंदोलकांना भावनिक संदेश दिला आहे.
मनोज जरांगे पाटील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जालन्यातील अंतरवाली सराटी गावात शेकडो मराठा आंदोलकांसह उपोषणाला बसले होते. त्यावेळी पोलिसांनी उपोषण कर्त्यांवर लाठीहल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला
जाहिरात

जाहिरात
