
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) गुहागर तालुक्याच्या वतीने पक्षसंघटना वाढीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शृंगारतळी येथील (ता. गुहागर) संपर्क कार्यालयात झाली. या वेळी गुहागर विधानसभा निवडणूक लढवण्यास आम्ही सज्ज आहोत. या मतदारसंघातून प्रमोद गांधी (Pramod Gandhi) यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

उप-जिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी गुहागर मनसेमध्ये गटतट नसून आगामी निवडणुका एकदिलाने लढवण्यास आम्ही सज्ज आहोत असे सांगितले. ते म्हणाले, तालुक्यात अनेक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत.’ याप्रसंगी गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गांधी म्हणाले, ‘तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनसेमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार गावागावात वाडी वस्त्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकीय घडा-मोडीला नागरिक कंटाळले असून मनसे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे.
या बैठकीसाठी प्रसमीर जोयशी, सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष मंदार रहाटे, जितेंद्र साळवी, संदेश ठाकुर, विभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, तुषार शिरकर, सुनिल मुकनाक, सुहास चोगले, सुशांत कोळंबेकर, वैभवी जानवळकर, वर्षा शितप, रजनी शितप, किरण आंबेकर, प्रसाद आदी उपस्थित होते
