
रत्नागिरी : खानू येथील महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीचे कार्यालय काल रात्री अज्ञातांनी फोडले. तसेच हाखंबा येथे कामाच्या ठिकाणी असलेला जे.सी.बी.ही फोडला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत.
खानू तोडफोडीत दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. हातखंबा येथील जेसीबी तोडफोड प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा अटकेची कारवाई सुरू होती.
समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओत नासधूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणा देत असल्याचेही दिसत होते. शुक्रवारी दुपारी महामार्गावर पाली उभीधोंड येथे जेसीबी काचा फोडून काहींना पळ काढला. पाली पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन कांबळे, संतोष कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सुमित चिले यांनी पाहणी केली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी, परिविक्षाधीन पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील आदी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान HAN कंपनीच्या खानू, पाली जोयशी वाडी येथील आर.एम.सी ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्याखाली १४ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहराध्यक्ष (रा. अभ्युदय नगर), अविनाश धोंडू मौंदळकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष (रा. नाचणे रोड रत्नागिरी), रूपेश श्रीकांत चव्हाण (रा. कोकण नगर), राजू शंकर पाचकुडे (रा. नरबे करबुडे). तसेच विशाल चव्हाण (रा. भोके), अजिंक्य महादेव केसरकर (रा. धवल कॉम्प्लेक्स), कौस्तुभ विश्वनाथ केळकर (रा. कोडगाव साखरपा, देवरूख), सतीश चंद्रकांत खामकर (रा. कुवारबाव), सुशांत काशिनाथ घडशी (रा. काटवाची वाडी), मनीष विलास पाथरे (रा. काळाचौकी मुंबई), सुनील राजाराम साळवी (रा. नाचणे रोड रत्नागिरी), महेश दत्ताराम घाणेकर (रा. देऊड), महेश गणपत घाणेकट (रा. जाकादेवी), रुपेश मोहन जाधव (रा. कोसुंब, संगमेश्वर, सध्या मारुती मंदिर) आदीचा समावेश आहे.