
प्रत्येक व्यापारांच्या दालनातील आकर्षक सजावट व दर्जेदार वस्तु कौतुकास्पद- आमदार शेखर निकम
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरामधील सर्व व्यापारी बंधू-भगिनींना आमदार शेखर निकम यांनी काल सोमवारी सायंकाळी सदिच्छा भेट देत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान सर्व देवरुख व्यापा-यांशी संवाद साधला. त्यांची व्यापाराविषयी विचारपूस केली. काही दुकानातील आकर्षक व दर्जेदार वस्तू दिसताच त्या वस्तूविषयी माहीती घेतली व कौतुकसुद्धा केले.
देवरुख शहरातील व्यापारी बंधू-भगिनींनी आमदार शेखर निकम यांचे तेवढेच आदराने स्वागत केले तसेच काळजीपोटी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. सर्व कार्यकर्ते नवयुवक, लहान मुलं याच्यामध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण होते. प्रत्येकजण निकम सरांसोबत फोटो काढण्यासाठी सरसावत होते. दीपावली निमित्त शुभेच्छा देताना सर्वांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण झाले होते. यातूनच जनतेच्या मनातील आमदार शेखर सर यांच्या बद्दलच असणारे प्रेम एक वेगळंच समाधान प्राप्त करुन देत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, तालुका संघटक बाळू शेठ ढवळे, देवरुख शहर अध्यक्ष हनिफ शेठ हरचिरकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, व्यापारी तालुका अध्यक्ष बाबा शेठ सावंत, युवक क्षेत्र अध्यक्ष अनिकेत सुर्वे, युवक तालुका अध्यक्ष पंकज पुसाळकर, सोशल मीडिया अध्यक्ष प्रतिक वनकर, युवक देवरुख शहर अध्यक्ष अमित(बंडू) जाधव, संजय गांधी निराधार तालुका कमिटी सदस्य बाळा शेठ पंदेरे, नांदळज सरपंच दिलिप (पप्पू) गोवळकर, देवरुख सरचिटणीस राजू वनकुंद्रे, देवरुख शहर उपाध्यक्ष देवेंद्र पेंढारी, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बांडागळे, माजी सरपंच प्रफुल्ल बाईत, माजी सरपंच राम शिंदे, माजी उपसरपंच प्रदिप कांबळे, युवक तालुका उपाध्यक्ष अमित जाधव, एनटी सेल उपाध्यक्ष अजय साबळे, जितेंद्र शेट्ये, रामू शेठ पंदेरे, गणपत चव्हाण, सुबोध चव्हाण, युवक देवरुख शहर सेक्रेटरी वसंत तावडे, युवक देवरुख शहर उपाध्यक्ष रवींद्र लाड, विध्यार्थी शहर अध्यक्ष इम्रान जेठी, महेंद्र पेंढारी, बारक्या कुंभार, मोहन पवार, सुवारे सर, पवार सर, बाबू शेठ निवळकर, ओम पुसाळकर आदी उपस्थित होते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.