मुंबई : मुंबई महापालिकेत झालेल्या विविध घोटाळ्यांची चौकशी करा. त्याचबरोबर ठाणे, नागपूर या जिल्ह्यांत झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु आहे.सरकारच्या चोरीची फाईल तयार आहेत. सत्तेत आल्यास तुमच्या प्रत्येक घाेटाळ्याची फाईल बाहेर काढू, असा आव्हान आज ( दि. १ ) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांनी राज्य सरकारला दिले.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांशी संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलेमेट्रो सिनेमेजवळ आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी झाले. ते सहभागी झाल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पावसाची रिपरिप सुरु असतानाही या मोर्चाला मुंबईकरांचा पाठिंबा पाहायला मिळाला. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ही खोके सरकारची भुतं पळवून लावा. हे भगवं वादळ दिसतय ती शिवसेनेची ताकद आहे. समझनेवालो को इशारा काफी आहे असं म्हणत ठाकरे गटाच्या मोर्चावर लक्ष केंद्रित केले.मुंबईत अनेक घोटाळे सुरु आहेत. या घोटाळ्यांची चौकशी करा. सरकारने ५० रस्त्यांची यादी दिली आहे. खरंतर त्यांच्यासाठी ५० आकडा खूप महत्त्वाचा आहे. यातील एकही रस्ता पूर्ण झाला नाही. तुम्ही कोणासाठी काम करत आहात मुंबईसाठी की खोके सरकारसाठी, असा सवाल त्यांनी सत्ताधारी गटावर केला. मुंबईला महापौरही नाहीत आणि नगरसेवकही नाहीत. मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करा. त्याचबरोबर ठाणे, नागपूर या जिल्ह्यांची देखील चौकशी करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु आहे. सरकारच्या चोरीची फाईल तयार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग आम्ही लवकरच दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.