मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम संथगतीने

Spread the love

रत्नागिरी :- गेल्या काही महिन्यांपासून मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे . सुरुवातीला हे काम वेगाने सुरू होते ; परंतु आता काम संथगतीने सुरू असल्यामुळे याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे . या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उसळत असल्यामुळे वाहनचालक , पादचारी तसेच दुकानदार हैराण झाले आहेत .
सुरुवातीला रेल्वे स्टेशनपासून ते गयाळवाडी दरम्यान अचानक रस्ता खोदण्यात आला . त्यानंतर पुढे कारवांचीवाडी ते खेडशीपर्यंत एक बाजू खोदाई केली . हातखंबा तिठ्यापर्यंत काही भाग खोदाई केला आहे . ज्या भागात खोदाई केली तेथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित होते . मात्र , तसे न करता ठेकेदाराने थेट हातखंबा तिठ्यांपर्यंत रस्ताची खोदाई केली . यातून सर्व्हिस रोडची पूर्णतः दुरवस्था झाली आहे .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page