२७ एप्रिल/राजापूर : कोकणच्या पर्यटन, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी मोठया प्रमाणावर निधी देवून कोकणाला खऱ्या अर्थाने जर कोणी न्याय दिला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यशासनाने दिला असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवीद्र चव्हाण यांनी सांगितले. ते राजापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या जाहीर प्रचार सभेत व्यासपीठावरून बोलत होते.
मंत्री चव्हाण म्हणाले की, त कोकणातून होणारे तरूणांचे स्थलांतर थांबावयाचे असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणणे गरजेचे असून आपल्या पुढील पिढीच्या उज्वल भविष्यसाठी या लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना कमळ चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने व राज्य शासनाने कोकणचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून सर्वाधिक निधी दिलेला आहे. या भागात मेडिकल कॉलेज, रस्ते, आरोग्य विषयक सुविधांसाठी निधी दिला. त्यामुळे कोकणामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची सुरूवात झालेली आहे.
आमच्या सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक आशा या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. कोकणातून तरूणांचे मोठया प्रमाणावर नोकऱ्यांसाठी स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर थांबावयाचे असेल तर कोकणात उद्योग व्यवसाय येणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार येण्यासाठी या निवडणुकीत कमळ चिन्हासमोर बटन दाबून नारायण राणे यांना विजयी करा असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.