कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा आवाका अजून वाढवावा – सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण.

Spread the love

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आपणच लढवणार आणि जिंकणारही…

रत्नागिरी | मार्च ०१, २०२४.

रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यकर्ता संमेलनात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीच्यावतीने भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवेल; आणि प्रचंड बहुमताने विजयी होईल असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

ज्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला अर्थसंकल्प समजत नाही अशा पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर विकासाला बसलेली खीळ रत्नागिरीकरांनी अनुभवली आहे. आता वेळ आली आहे बदलाची. राष्ट्रभूषण पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतात झालेल्या सकारात्मक बदलांना लोकांपर्यंत पोचवणे आपले काम आहे. लोकांना मोदींवर विश्वास आहे. त्या विश्वासाला बळ मिळाले की लोकांमध्ये आकांक्षा निर्माण होतील आणि त्यांच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार समर्पित भावाने काम करेल.”

ते पुढे म्हणाले, “रोटी, कपडा, मकान म्हणत काँग्रेसने देशवासियांना आत्तापर्यंत फसवले, गरिबी हटाव म्हणत गरिबाला हटवले. पण मोदीजींनी आपले दायित्व पार पाडण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अवघ्या १० वर्षांत २५℅ गरिबी दूर केली. रोजगार उपलब्ध करून दिले. एका राममंदिराच्या निर्मितीतून जवळपास २ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. ही आहे कल्पक नेतृत्त्वाची गुणवत्ता.”

बाळ माने म्हणाले, “आता कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा किंतू-परंतू मनात आणू नये. उलट आता जोमाने काम करा. दिलेली करणीय कार्य आणि लोकांच्या मनातील किल्मीषे दूर करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात सदैव संपर्क करा. या निवडणूकीत केलेले काम आपल्याला विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही उपयुक्त ठरणार असल्याने आजचे परिश्रम ही एकदाच करायची गुंतवणूक आहे. अशी खुणगाठ मनाशी बांधा.”

“विनायक राऊत यांनी केलेल्या वल्गना ऐकून आपले रक्त उसळले पाहिजे. कधीकाळी आमच्या सहकार्याने लोकसभेत गेलेले राऊत जेव्हा आम्हाला आव्हान देण्याची कुचेष्टा करतात; त्याचा परिणाम निवडणूकीत दाखवायची वेळ आली आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत राऊतांना अस्मान दाखवू.” असा आत्मविश्वास श्री. प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “मोठमोठे रणनितीकार जेव्हा भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी करतात त्यावेळी आपल्या नेतृत्त्वाने आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या काम लोकांच्या पसंतीस उतरले असल्याचे पहावयास मिळते. तरीही हे युद्ध आहे; गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने गांभीर्याने कामाची गती वाढवावी.

यावेळी झालेले पक्षप्रवेश पक्षाला बळकटी देण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. चिपळूण व रत्नागिरी तालुक्यात संघटना अधिक सशक्त होत असल्याने यावेळच्या निवडणूकीत भाजपासह महायुतीचा प्रभाव दिसेल अशी अटकळ बांधली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page