सा. बां. मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न.
रत्नागिरी | मार्च ०१, २०२४.
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्त्व, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प आणि त्यादृष्टीने त्यांनी उचललेली कणखर पाऊले तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पण कर्तव्यकठोर नेतृत्त्वावर विश्वास ठेवून, कोकण भाजपाचे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण व रत्नागिरी तालुक्यांतील अनेक कार्यकर्त्यांनी आज स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
“पक्षाची ध्येय-धोरणे, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली कणव, राष्ट्रीय दायित्वाची जाणीव आणि कोविड-१९ सारख्या संकटात निर्माण केलेली वैश्विक प्रतिमा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला भावणारी आहे. राजकीय क्षेत्रात आत्तापर्यंत आम्ही अनेक सन्मानाची पदे भूषवली, पक्षाने आम्हाला मोठे केले तसे आम्हीही पक्षाप्रती निष्ठेने काम केले. मात्र आता यापुढील काम मोदीजींच्या नेतृत्त्वात करण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. बाळासाहेब माने, प्रमोदजी जठार, राजेशजी सावंत व डॉ. विनय नातू यांच्यासारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि मा. ना. रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश हा तर दुग्धशर्करा योगच.” अशा भावना प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
चिपळूणमधील प्रवेश करणारे कार्यकर्ते –
सौ. स्नेहा मेस्त्री (मा. सभापती, पं. स. चिपळूण), भुरण साहेब, सुनील मेस्त्री (मा. सरपंच, ग्रा. पं. खेर्डी), विद्यमान सदस्या सौ. अपर्णा दाते, मा. सदस्य विनय दाते, मा. सरपंच रवींद्र फाळके, सतीश पंडित, राजेश शिंदे, सौ. स्मिता ढवळीकर, सौ. आरती धामणस्कर, सौ. अनुराधा सोनावणे, सौ. स्वाती सावंत, सौ. विद्या मेस्त्री.
रत्नागिरीमधील प्रवेश करणारे कार्यकर्ते –
साबीर पटेल, मेहताब बस्ता, सनम पटेल, नौशाद पटेल, यासीन गडकरी, रमजान पटेल, अंजुम सोलकर, मन्सूर होडेकर, मुदू दावत, शाहनवाज पटेल, आबीद होडेकर, नितीन दावत, सलमान हुश्ये, अंजुम गडकरी, मुन्ना गडकरी, इरफान गडकरी, जलील गडकरी, नरेंद्र यादव.
रत्नागिरीतील प्रवेशासाठी तालुकाध्यक्ष श्री. संयोग (दादा) दळी यांनी विशेष प्रयत्न केला. याबद्दल उपस्थित नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच हा झंझावात असाच अविरत सुरू ठेवण्याची सूचना दिली.